Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : संजय कदमांची जागा अमोल कीर्तिकर घेणार ?

banner 468x60

दापोली माजी आमदार संजय कदम उद्धवसेनेतून बाहेर पाडल्यानंतर आता अमोल कीर्तीकर यांची दापोली विधानसभा मतदारसंघात एन्ट्री झाली आहे. २५ ते २८ मार्च यादरम्यान त्यांच्या उपस्थितीत उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90 banner 728x90

मात्र अमोल कीर्तिकर यांच्या येण्याने दापोलीत कार्यकर्त्यानमध्ये उभारी येईल का हे पाहावं लागेल. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेकडून उद्धवसेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. राजन साळवी आणि संजय कदम

या माजी आमदारांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात उद्धवसेना कमकुवत झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच संजय कदम यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आता येथे अमोल कीर्तिकर यांची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या माध्यमातून उद्धवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

लोकसभा निवडणुकीत त्यांचा खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून थोड्या फरकाने पराभव झाला होता. कीर्तीकर यांच्यावर पुन्हा दापोली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. २०१४ च्या निवडणुकीत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाल्यानंतर अमोल कीर्तिकर यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती.

त्यांनी येथे कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला होता. मात्र योगेश कदम यांचा येथील राजकारणात प्रवेश झाल्यानंतर अमोल कीर्तीकर येथून परत गेले. आता संजय कदम यांनी शिंदेसेनेत पक्षप्रवेश केल्यामुळे उद्धवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

पक्षात असलेल्या निष्ठावंत उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी अमोल कीर्तिकर यांच्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. मंगळवार २५ पासून २८ मार्चपर्यंत ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *