Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ

रत्नागिरी : इचलकरंजीतून रत्नागिरीत गांजा घेऊन येणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

banner 468x60

रत्नागिरीकडे गांजा येणाऱ्याच्या रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सत्यजित सदाशिव सत्यजित जाधव जाधव (वय ३४, रा. विकासनगर, इचलकरंजी) याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सकाळी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून नऊ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी तो बसमधून प्रवास करीत होता;

banner 728x90

मात्र पोलिसांनी बस अडवून गांजासह त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित जाधव लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने सध्या बेरोजगार होता. तो गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच तो गांजा घेऊन रत्नागिरीकडे निघाल्याची माहिती अंमलदार सागर चौगले यांना प्राप्त झाली. त्यांनी पोलिस निरीक्षक कळमकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी एक पथक सांगली फाट्याजवळ तैनात केले होते.


रत्नागिरीला गांजा पोहोचविण्यासाठी जाधवने बसचा मार्ग निवडला होता. इचलकरंजीतून एका बसमध्ये बसला. तो सांगली फाट्यावरून पुढे जाणार असल्याने पथकाने याच ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून नऊ किलो गांजा व इतर साहित्य असा दोन लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

जाधव याने गांजा कोठून आणला, याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याने ओरिसा येथे जाऊन गांजा आणल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्याकडे बसची तिकिटेही मिळाली असून, त्याला गांजा देणाऱ्यांचा शोध आता घेण्यात येणार आहे. गांजा विक्रीच्या मुळापर्यंत जाणार असल्याचेही कळमकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *