Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार पाहा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याच्या ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांच्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सादर करण्यात आलेल्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

या आराखड्यानुसार ३५७ गावांतील ७२२ वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील भूजलपातळीत वाढ झाली होती. जिल्ह्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने तलाव, विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली आहे.

कडक उन्हामुळे टंचाई निवारण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.जिल्ह्याच्या एकूण आराखड्यात ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून सादर करण्यात येणाऱ्या टंचाई कृती आराखड्यातील रकमेमध्ये काटछाट करून त्याला मंजुरी देण्यात येते.

मात्र, यंदाच्या आराखड्याच्या रकमेत काहीही बदल न करता त्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.

नवीन विंधन विहिरी : ९६ गावे, १८४ वाड्या, २ कोटी २० लाख ८० हजार
विंधन विहीर दुरुस्ती : २४ गावे, ५२ वाड्या, ३१ लाख २० हजार
नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती : ३९ गावे, ५९ वाड्या, ५९ योजना, ४ कोटी १३ लाख ५० हजार
तात्पुरत्या पूरक नळपाणी पुरवठा योजना : ११ गावे, १९ वाड्या, १९ योजना, ९८ लाख १० हजार
विहीर खोल करणे, गाळ काढणे : ५१ गावे, ९८ वाड्या, ९० लाख ७० हजार
खासगी विहीर अधिग्रहण करणे : ५ गावे, ६ वाड्या, ३ लाख
टँकरने पाणीपुरवठा : १३१ गावे, ३०४ वाड्या, ९२ लाख ४० हजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *