खेडला मिळणार नवा एसटी स्टॅन्ड, गोळीबार मैदानात भूमिपूजन, निधीसाठी मंत्री महोदय योगेश कदमांचा विशेष प्रयत्न

banner 468x60

खेडमध्ये गोळीबार मैदानात आज खेड बस स्थानकाचे भूमिपूजन करण्यात आलं आहे. खेड एसटी आगार हे सबंध कोकण आणि महाराष्ट्राच्या प्रमुख जिल्ह्यांना एसटी द्वारे जोडणारे एक प्रमुख आगार आहे.

banner 728x90

हजारो प्रवासी रोज इथून प्रवास करतात. त्यामुळे या आगाराचा कायापालट हा प्रवासी आणि वाहतूक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा आज पार पडला.

त्यामुळे खेडमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्याना आता सुसज्ज असं एसटी आगार मिळणार आहे.यावेळी गृह राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, तहसिलदार सुधीर सोनवणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, शशिकांत चव्हाण, अण्णा कदम, सचीन धाडवे, कुंदन सातपुते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, सर्वसामान्य जनता एसटीमधून प्रवास करत असते. त्‍यामुळे सर्वांना एसटीबद्दलची एक वेगळी आपुलकी आहे. एसटी बसस्थानक सुसज्ज असणे, एसटी स्वच्छ असणे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून गृहराज्यमंत्री कदम यांनी या प्रकल्पासाठी निधी मंजूर करुन घेतला.यामधून सुसज्ज असे बसस्थानक उभे राहील.

येथील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी मिनी बसेस देण्याच्या मागणीसाठी आपण जिल्ह्यातील सर्व आमदारांसह परिवहन मंत्र्यांची भेट घेऊ आणि पुढील सहा महिन्यात मिनी बसेस उपलब्ध करुन घेऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महिलांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत आहे. सुरक्षितेबरोबर आरोग्यही फार महत्त्वाचे आहे. आरोग्याच्य दृष्टीने एसटी बसस्थानकातील सर्व शौचालयेही स्वच्छ असणे गरजेचे आहे. बसस्थानक स्वच्‍छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या मागणीनुसार खेड येथील क्रीडांगणासाठीही निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

गृह राज्यमंत्री कदम म्हणाले, खेड बसस्थानक एक नवं स्वरुप घेणार आहे. याचे समाधान आहे. या बसस्थानकामुळे नागरिकांचा त्रास, समस्याही दूर होणार आहेत.

येथे बसस्थानक होत असल्याने आता मैदानाची गरज भासणार आहे. जिल्हा नियोजन मधून मैदानासाठी येथील मागील बाजूला आरक्षित जागेवर क्रीडांगणासाठी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *