मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित व प्रतीक्षेतील कशेडी घाटाला पर्याय असणारे दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुले झाल्याने शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.बोगद्यातील
वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.दोन्ही बोगद्यांत कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ केव्ही क्षमतेच्या विजेची मागणी केली आहे.
त्यासाठी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याची सूचना महावितरणने केली होती. मात्र, अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की नाही, याबाबत साशंकता होती.
मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन्ही बोगद्यांत जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्याने दोन्ही बोगद्यांतून वाहतूक सुरू झाली आहे. दोन्ही बोगदे कार्यान्वित झाले असले तरी अजूनही काही कामे अपूर्ण आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















