चिपळूण : आईसोबत शेवटचं जेवण, कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळून आई-मुलाचा मृत्यू वडिलांचे 6 महिन्यांपूर्वी निधन मागे पत्नी, दोन वर्षाची मुलगी भीषण अपघात

banner 468x60

चिपळूणमधील कुंभार्ली घाटातील ही भीषण घटना. पुणे येथून कुंभार्ली गावी महाशिवरात्रिच्या यात्रेला निघालेल्या आई आणि मुलाचा कारच्या भीषण अपघातात मृत्यु झाला. कार ४०० फुट दरीत कोसळून झालेला हा अपघात दोन दिवसांनी, मंगळवारी सायंकाळी उशिरा उजेडात आला.

banner 728x90 banner 728x90

या अपघातात विश्वजित जगदीश खेडेकर (वय ४२) तर सुरेखा जगदीश खेडेकर (वय ६५) या दोघाचा मृत्यू झाला. विश्वजित खेडेकर हे आपल्या आईसोबत स्विफ्ट डिझायर कारने पुणे येथून कुंभार्ली येथे महा शिवरात्र यात्रेसाठी गावी जात होते. त्यांची कार कुंभार्ली घाटात पोहोचली असता गाडी खोल २०० फुट दरीत कोसळली. यात दोघांना जबर मार लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही घरी न आल्याने शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उशिरा ही घटना उघडकीस आली विश्वजित व सुरेखा जगदीश खेडेकर हे दोघे महाशिवरात्री यात्रेसाठी कारने पुणे येथून गावी कुंभार्लीकडे येत असताना पाटण येथे रविवारी रात्री साडे आठ वाजता जेवण आटोपून रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली घाटातील पोलीस चौकीपासून कार पुढे निघून गेली असता चौकीपासून तिसऱ्या अवघड वळणावर सुमारे ४०० फूट खोल दरीत कार कोसळली.


या दोघाचा मोबाईल लोकेशन आणि ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता मायलेकाचे मृतदेह सापडले. अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातानंतर कुंभार्ली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विश्वजित खेडेकर यांच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या अपघातामुळे खेडेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. खेडेकर यांच्या मागे मुले, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे.


खेडेकर कुटुंबीयांवरती मोठा आघात   काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्ध्ये यांचे खेडेकर हे नातेवाईक आहेत. त्यांनी ग्रामस्थांसह तात्काळ घटनास्थळी पोहचून रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढले. या भीषण अपघातानंतर कुंभार्ली गावातही हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे खेडेकर कुटुंबीयांवरती मोठा आघात झाला आहे. जगदीश खेडेकर यांच्या वडिलांचे ही सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर खेडेकर यांना पत्नी व मुलाच्या मृत्यूमुळे हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.


विश्वजित जगदीश खेडेकर हे नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. एकाच वेळी माय – लेकाचा मृत्यू झाल्याने खेडेकर कुटुंबीयावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सहा महिन्यांपूर्वीच विश्वजीत यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं, विश्वजित त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन वर्षाची मुलगी असं कुटुंब आहे. या घटनेने कुंभार्ली गाववरही मोठी शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *