ब्रिलियंट करिअर अकॅडमी, दापोली, जेसीआय, दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचे आयोजन रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता शहरातील मराठा मंदिर शाळेच्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची यासारख्या विषयांमध्ये नेहमीच आवड आणि रुची असते. या कलेला वाव मिळावा आणि विद्यार्थी दशेतच आपल्यातील अंगीभुत गुण ओळखावेत या उदात्त हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा चार वयोगटांमध्ये घेतली जाणार असून त्यामध्ये वयोगट ३ ते ६ वयोगट( रंगभरण), वयोगट ७ ते १० ( रंगभरण), वयोगट ११ ते १६ ( चित्र काढून रंग भरणे) , आणि वयोगट १७ पासून पुढे खुला गट ( चित्र काढून रंग भरणे) अशा गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे, स्पर्धेसाठी नाममात्र ₹३०/- शुल्क रुपये असून स्पर्धकांनी आपली नावे खालील दिलेल्या क्रमांकावर फोन करून नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे बक्षीस देखील देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे हे दुसरे पर्व असून गतवर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे यावर्षीही देखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
प्रवेश नोंदणीसाठी संपर्क = 9604039779, 8379960423, 9420301705.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















