दापोलीत पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. घटना आहे रविवार 9 फेब्रुवारी 2025 च्या संध्याकाळची साधारण 5 वाजताची ठिकाण आहे घटना घडलीय दापोलीतील खोंडा या परिसरात एका कॉलेज शेजारी. यामधील अल्पवयीन मुलगी आणि आरोपी शेजारी शेजारी राहतात.
शेजारी शेजारी राहत असल्याने तशी तोंड ओळख होती. मात्र अश्पाक अस काही करेल याची कल्पना मुलीला ही नव्हती. अल्पवयीन मुलगीच वय 17 असून छेड काढलेल्या आरोपीच नाव अश्पाक पावसकर वय 41 आहे. 17 वर्षीय मुलीचा अश्पाक पावसकरने विनयभंग करून मुलीशी गैरवर्तन केलं.
अल्पवयीन मुलीला सायंकाळी पाच च्या सुमारास त्या मुलीला लज्जा वाटेल अशा पद्धतीने आवाज दिला ए बाय इकडे ये असे हाक मारुन बोलाविले तेव्हा मुलीने त्याने हाक मारली म्हणुन त्याच्या घराजवळ गेली असता त्याने फिर्यादीला त्याचे जवळ ओढले व तिच्या ओठाला हात लावला व नंतर तीच्या गालाची पप्पी घेतली आणि अंगावरुन हात फिरवु लागला असून छातीला हात लावला व घरी कोणाला सांगीतलेस तर तुला मारुन टाकेन अशी मुलीला धमकी दिली. दरम्यान नेमकं प्रकरण काय ते पाहूयात


हा सर्व प्रकार मुलीने आपल्या घरच्यांना सांगितला त्यानंतर घरच्यानी थेट दापोली पोलीस स्टेशनला धाव घेतली
याप्रकरणी अश्पाक लियाकत पावसकर याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 74,75,79,351 (2) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 ( पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास दापोली पोलीस नलावडे आणि पोउनी महेश पाटील करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















