रत्नागिरी जिल्हातील आणि दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील बॉम्बे रक्तगट असलेल्या ओंकार शरद धनावडे या युवकाने कर्नाटक राज्यातील एकवर्षीय बाळाला रक्तदान करून, ओंकार या बाळासाठी देवदूत ठरला आहे.
कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर येथील एक वर्षीय बाळावर शस्त्रक्रिया करायची होती. शस्त्रक्रियेपूर्वी बाळाच्या रक्तगटाची चाचणी केली तेव्हा बाळाचा बॉम्बे रक्तगट असल्याचे आढळले. या गटाचे रक्त मिळणार नाही, अशी स्थिती असल्याने चिंताग्रस्त पालकांना दापोली आणि सांगलीतील या अती दुर्मिळ रक्तगटातील रक्तदात्यांनी या बाळाला जीवदान दिले.
ओंकार हा रत्नागिरी जिल्हातील एकमेव बॉम्बे रक्तगटाचा दाता आहे. बॉम्बे रक्तगट हा देशातील दुर्मिळ असा रक्तगट आहे. या रक्तगटाचे भारतामध्ये 180 दाते आहेत आणि जगामध्ये 540 दाते आहेत. 1952 साली एस. एम. भेंडे यांनी या रक्त गटाचा शोध लावला.
मुंबईत शोध लागला म्हणून या रक्तगटाला बॉम्बे रक्तगट असे नाव देण्यात आले आहे. या गटाचा सरासरी दहा लाखात एक रक्तदाता सापडतो. चार वर्षांपूर्वी ओंकारने आंजर्वेतीलरक्तदान शिबिरात ओ पॉझिटिव्ह रक्तगट म्हणून रक्तदान केले होते. या वेळी मुंबई हॉस्पिटलची टीम रक्तसंकलन करण्यासाठी आली होती.
यावेळी ओंकारचा रक्त गट हा बॉम्बे ग्रुपचा आहे, असे सांगण्यात आले. बाँबे रक्तगट हा सामान्य चाचणीने ओळखता येत नाही. हा दुर्मीळ असल्याने तो अधिक काळ सुरक्षित ठेवावा लागतो. या गटाचे रक्त अत्यंत कमी तापमानात ठेवावे लागते.
या रक्तगटाचे सर्वाधिक लोक मुंबईत असल्याचे म्हटले जाते. माझे दुर्मीळ रक्त हे अनेकांच्या कामी येत आहे. रक्तदान केल्याने जे समाधान मिळते, ते अन्य कोणत्याही गोष्टींतून मिळत नाही – ओंकार धनावडे, आंजर्ले, दापोली

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















