रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे मधील युवकांचा मनसेत पक्षप्रवेश

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील गोळप जिप गटातील कोळंबे मधील अनेक युवकांनी आज मनसेच्या रत्नागिरी तालुका संपर्क कार्यालयात पक्षप्रवेश केला आहे.

पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी पक्षात स्वागत केले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणीसाठी मनसेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

येणाऱ्या काळात असे अनेक पक्षप्रवेश तसेच संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येणार असल्याचं तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी म्हटलं आहे.

या पक्षप्रवेशावेळी मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव,तालुका सचिव अभिलाष पिलणकर , विभाग अध्यक्ष संजय आग्रे , उपविभाग अध्यक्ष नितीन रायकर, सोमनाथ पिलणकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *