मुंबई-गोवा महामार्गांवर बहादूरशेख नाका येथे भरधाव आयशर टेम्पोने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८.४५ वा.च्या दरम्यानं घडली.
पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री बहादूरशेख नाका येथे रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोने चिपळूण कराड रोडने बाजारपेठेकडे जाणाऱ्या मोटारसायकलला जोरात धडक दिली.
यात दुचाकीस्वार विनोद नामदेव राठोड (२८, दिग्रस, यवतमाळ) हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मोटार सायकलच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघात झाला तेव्हा बाजूलाच हवालदार गणेश नाले व ए. एस. आय लिंगायत उपस्थित होते.
त्यांनी मोटारसायकल स्वाराला ताबडतोब रुग्णवाहिकेने कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलवले. टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठविले. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरु केली.
अपघाताचे वृत्त समजताच पोलीस उपनिरीक्षक विकास निकम, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले व मदत कार्य सुरु केले. अपघातातील मोटारसायकल ही, यवतमाळ पासिंग असून ती सचित नामदेव राठोड याच्या मालकीची असल्याचे समजते. तर टेम्पो रत्नागिरी पासिंग असून तो साहिल आंबोळकर याच्या नावावर असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बहादूरशेख नाक्यात हायवेचे काम सुरु आहे. येथे बॅरिकेट्स लावण्यात आली असून रत्नागिरीकडून येणारी गाडी रस्ता ओलांडणाऱ्या चालकाला दिसत नाही. त्यामुळेच येथे अनेक अपघात होत असतात तरी येथील बॅरिकेटसची उंची कमी करावी, अशी मागणी होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















