चिपळूण : नोकरीच्या आमिषाने तब्बल 11 लाख 48 हजारांची फसवणूक

banner 468x60

चिपळूणमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ११ लाख ४८ हजार १०५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना ऑक्टोबर महिन्यात घडली.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समरीन हिदायत चौगुले (३१, रा. खेर्डी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

२१ ते ३१ ऑक्टोबर या मुदतीत मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीने चौगुले यांच्या मोबाईल व्हॉट्सॲप नंबरवर ‘डेव्हनेट जॉब इंडिया ऑर्गनायझेशन’ या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे, असा मेसेज करत नोकरीचे आमिष दाखविले. यातूनच चौगुले यांची ११ लाख ४८ हजार १०५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *