रत्नागिरी : जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांना पितृशोक

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांचे वडील रामचंद्र विठ्ठल कुलकर्णी, वय-८२ यांचे आज दुपारी १२.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

रामचंद्र कुलकर्णी हे उत्तम शेतकरी होते. त्यांचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बाणगांव हे मूळ गाव आहे. उद्या मंगळवारी सकाळी त्यांच्यावर मूळ गावी सकाळी ८.०० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्याकरीता त्यांना रत्नागिरीतून गावी नेण्यात आले आहे. रामचंद्र कुलकर्णी यांच्या पश्‍चात मुलगा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, दोन कन्या, नातवंडे असा परिवार आहे. रामचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *