Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी गती! पादचारी पुलाचे भूमिपूजन, बुकिंग सेंटर आणि रेल्वे थांब्यांसाठी शेखर निकम यांचा पाठपुरावा खेड : बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा, मालवाहू रिक्षा आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर!

चिपळूण : महिलेच्या डोक्यात सिलेंडर मारून हत्या

banner 468x60

चिपळूणमधील सावर्डे-नांदगाव येथे ६० वर्षीय महिलेच्या डोक्यात सिलेंडर घालून अज्ञाताने हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता उघडकीस आली.

संबंधित महिलेच्या अंगावरील साडी घरापासून काही अंतरावर मिळाली, तर त्यांचे दागिनेही चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.


सुनिता परशुराम पवार (नांदगाव खुर्द, गोसावीवाडी) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला घरी एकटीच होती. दहीहंडीच्या उत्सवानिमित्त पती आणि वाडीतील नागरिक बाहेर गेले होते.

त्याच दरम्यान अज्ञात इसमाने महिलेच्या घरात प्रवेश करुन तिच्या डोक्यात सिलेंडर मारुन तिचे दागिने आणि पैसे लुटून नेल्याची घटना घडली आहे. संबंधित महिलेच्या अंगावर केवळ परकर आणि ब्लाऊज होते, तर त्यांच्या अंगावरील साडी घरापासून काही अंतरावर नांदगाव रस्त्याच्या पलीकडे आढळून आली.

नांदगाव येथे घडलेल्या या हत्येच्या घटनेची खबर सावर्डे पंचक्रोशीत पसरल्यानंतर गावागावातून अनेक लोक नांदगावमध्ये आले. महिलेची हत्या झाल्याची पाहून सर्वांना धक्का बसला.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्यासह अन्य पोलीस यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा तपास सुरु केला आहे. संबंधित महिलेचे पती पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा मुलगा मुंबई येथे पोलीस अधिकारी म्हणून काम करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *