Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

मुंबई -दाभोळ एसटी बसचा अपघात

मुंबई -दाभोळ एसटी बसचा अपघात

banner 468x60

मुबंईहुन दाभोळकडे येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून दाभोळकडे येत असताना सकाळी ७ च्या दरम्यान मानखुर्द येथे अपघात झाला आहे.

या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मुंबई सेंट्रलवरून दाभोळ येणारी बस असल्याने दाभोमधील प्रवाशांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे

मात्र यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. बसच्या पुढील बाजूला डावीकडे जोरदार धडक बसल्याने बसची काच फुटून नुकसान झालं आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *