Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

मंडणगड : सावित्रीनदी बाणकोट खाडी पात्रात ड्रेझरच्या मदतीने नियमबाह्य वाळु उपसा

banner 468x60

बाणकोट खाडी पात्रातील गेल्या काही दिवसापासून सुरु असलेला ड्रेझरचा वाळु उपसा महसुल विभाग वाळु उपशाचे लिलावाचे नियम व अट शर्थीचे नियमांना वाटण्याच्या अक्षता लावून सुरु असल्याची जोरदार चर्चा खाडी पटय़ात सुरु आहे.

banner 728x90 banner 728x90

सावित्रीनदी पात्रातील बाणकोट खाडी शिपोळे बंदर ते वेसवी क्षेत्रात ड्रेझर उपशासाठी लिलावाने मंजुर झाले आहे . सध्या बाणकोट वेसवी परिसरात ड्रेझरचे मदतीने वाळु उपसा सुरु झालाय .

वाळु उपसा करताना लिलाव प्रक्रीयेत वाळु उपसा करण्यासाठी काही निर्देश घालून देण्यात आले आहेत. रात्रीचे वेळी ड्रेझरचे वाळु उपशास परवानगी नसतानाही रात्री ड्रेझरच्या आवाजाची धडधड सुरु असल्याने दिवस रात्र वाळु उपसा सुरु असल्याची चर्चाही ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.

लिलाव पक्रीयेमध्ये दिवसभरात ड्रेझरने दररोज किती वाळु उपसा करावा याचे निर्देशही दिलेले असताना दिवसभरात वाळुचे १०० ते २०० ब्रासपेक्षा जास्त वाळू उपसा बार्जेसद्वारे केली जात असल्याची चर्चा असल्याने शंभर ब्रासच्या निर्देशाचे काय असा पश्न ही उपस्थित होऊ लागला आहे.

खाडी पात्रातील गाळ साफ व्हावा या मुख्य उद्देशाने वाळु उपश्याचा लिलाव झालेला असल्याने उपशानंतर आलेला गाळ्याचे नेमके काय केले जात आहे या बाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. दिवस रात्र ड्रेझरची धडधड सुरु असल्याने परिसरातील नागरीकांना ध्वनी प्रदुषणासही सामोरे जावे लागत आहे. महसुल प्रशासनाने या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

संयुक्त रेती गटांशी चार तहसिल कार्यालयांचा संबंध येत असल्याने नेमकी कार्यवाही कोणी करावी या विषयी महसुल विभागामध्ये असलेला असमंजस्य अद्याप दुर झालेले नसल्याने, अथवा कारवाई करण्याचे धारिष्ठ्य दाखवले जात नसल्याने तक्रारादारांमध्ये नाराजी आहे.

त्यामुळेच वाळु उत्खन्नासाठी पर्यावरण विभाग, मेरीटाईम बोर्ड व खनिकर्म विभागाने घालून दिलेल्या निर्देशांचे शंभर टक्के पालन होत आहे अथवा नाही याची दक्षता सर्व संबंधीत खात्यांनी घेणे गरजेचे बनले आहे.


बाणकोट येथे अरबी समुद्र व सावित्री नदी येथे सँडबार तयार झाल्याने एकतर जलवाहतुक धोक्यात आलेली आहे. येथील गाळ काढण्याची मागणी अनेक वर्षापांसून प्रलंबीत असताना या सँड बारमधील गाळ व वाळु काढण्याची आवश्यकता आहे.

खाडी पात्र मगरी व डॉल्पनचे सुरक्षीत आवासाकरिता प्रसिध्द आहे याशिवाय येथील वाल्मिकीनगर, शिपोळे, वेसवी येथे मोठ्या प्रमाणावर मच्छिमारीही केली जाते.

या आक्षेपांमुळे ड्रेझींग करताना सर्व नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याशिवाय जास्तीचा वाळु उपसा करुन शासनाचा महसुल तर बुडविला जात नाही याची खातरजमा करण्याचे काम महसुल विभागावर आल्याने ड्रेझिंगशी संबंधीत मंडणगड, श्रीवर्धन, महाड, म्हसळा, यासबंधी कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *