Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

जानवळे गावची सुकन्या कु. आर्या ओंकार संसारेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सत्कार

banner 468x60

गुहागर (प्रतिनिधी ) गुहागर तालुक्यातील जानवळे गावची सुकन्या कु. आर्या ओंकार संसारे हिला राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळाल्याने

banner 728x90 banner 728x90

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने शृंगारतळी येथील मनसे जनसंपर्क कार्यालय येथे गुहागर संपर्क अध्यक्ष श्री प्रमोदजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली

गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर व तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी, उद्योजक ओंकार संसारे, रुची संसारे,अंतिम संसारे, अभिषेक संसारे, उमेश संसारे, मानसी खातू, सचिन संसारे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या जनसंपर्क कार्यालय शृंगारतळी येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कु. आर्या संसारे हिचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *