Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज! 37 लाखांची फसवणूक

banner 468x60

खेड येथील आयडीबीआय बँकेत ३७ लाखांचे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी बँकेच्या सोनारासह १० जणांविरोधात बुधवारी (दि. २७) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. १४ फेब्रुवारी २०२२ ते दि. ८ डिसेंबर २०२३ या मुदतीत घडली आहे. याबाबतची फिर्याद जितेंद्र नारायणदास शाह यांनी येथील पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

प्रदीप रामचंद्र सागवेकर (बँकेचे सोनार), गौरव विष्णू सागवेकर, नीलिमा निलेश सागवेकर, सागर रमेश सागवेकर, निलेश रमेश सागवेकर, सुधीर परशुराम राणीम, सौ. अक्षता सुधीर राणीम, समीर रघुनाथ म्हसलकर ( सर्व रा. पेठवाडी, ता. खेड ), राहुल अनंत सकपाळ, कमलाकर हरिश्चंद्र पालकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या दहा आरोपींनी खेड येथील आयडीबीआय बँकेत सोन्याचे दागिने गहाण ठेऊन सोने तारण कर्ज मिळण्याकरिता अर्ज करून सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून बनावटी दागिने बँकेत सोने तारण कर्जाकरिता गहाण ठेवत असताना बँकेतील करारनामा करून नियुक्त केलेले सोनार आरोपी प्रदीप रामचंद्र सागवेकर यांनी आणि अन्य नऊ जणांनी सोने तारणकरीता

गहाण ठेवलेले दागिने हे बँकेचे सोने परीक्षक म्हणून तपासून हे दागिने बनावट आणि खोटे असल्याचे माहीत असून ते खरे असल्याचे भासवून तसे प्रमाणपत्र देऊन आरोपी यांना गैरलाभ व्हावा व बँकेची गैरहानी व्हावी या उद्देशाने अप्रामाणिकपणे ३७, ३५, ५८० /- रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *