मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीच्या पुलावर कंटेनर उलटून अपघात झाला.
तीन महिन्यातील ही तिसरी घटना असून, यामुळे जगबुडी पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका उड्डाणपुलाकडून जगबुडी नदीच्या पुलाकडे उतरणाऱ्या तीव्र वळणामुळे जगबुडी पुलावर सातत्याने मोठे कंटेनर उलटून अपघात होत आहेत.
शनिवारी मुंबई येथील पेपरमिलमधून पेपरचे रोल घेऊन चिपळूणकडे जाणारा कंटेनर (एमएच ४३, बीवाय- २२७) घेऊन चालक राहुल गिरी (वय २९, रा. ठाकुरपाडा, दहिसर) हा मुंबई ते चिपळूण असा निघाला होता. जगबुडी पुलावरील तीव्र उतारावर नियंत्रण सुटून कंटेनर जगबुडी पुलावरील कठड्यावर आदळून उलटला. या अपघातात चालक गिरी किरकोळ जखमी झाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















