उदय सामंत : दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ

banner 468x60

गेल्यावेळी 90 हजार मताधिक्याने निवडून आलो. यावेळी दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

हा आत्मविश्वास तुमच्यामुळे आहे असे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी नमूद केले.

मंत्री सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी शहरातील तब्बल 122 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. (Maharashtra News) मंत्री उदय सामंत म्हणाले मागच्या अडीच वर्षांत सवांदाची कोणाला सवय नव्हती. काही लोकं फक्त फेसबुक लाईव्ह करायचे.

म्हणजे मी बोलल्यानंतर समोरून कोणी बोलूच नये, ही त्यांची भूमिका असायची. एकतर्फी संवाद, मी सांगेन तेच बरोबर आहे ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाही असे म्हणत सामंत यांनी अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना टोला मारला.

सामंत पुढे बोलताना म्हणाले स्वतः आरोग्याचं दुखणं असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी पाच किलोमीटर पेक्षा अधिक इर्शाळगड चढून गेले. तेथील दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखा मुख्यमंत्री लाभणे हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावे लागेल असेही सामंत यांनी नमूद केले.

गेल्यावेळी 90 हजार मताधिक्याने निवडून आलो, यावेळी दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हा आत्मविश्वास तुमच्यामुळे आहे असे जनतेचे आभार मानत उदय सामंत यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *