Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : आमिर काझी यांना क्रांती रत्न पुरस्कार

banner 468x60

संविधानिक आणि सामाजिक कार्यामुळे खेड तालुक्यातील मुबके गावचे संविधान प्रचारक आमिर काझी याची क्रांती रत्न पुरस्कारासाठी निवड होऊन संविधान दिनी ठाण्यामध्ये आयोजित संविधान महोत्सव या कार्यक्रमात क्रांतीसुर्य संघटना च्या वतीने त्यांना क्रांती रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या आठ वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आमिर सक्रिय आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या संघटनेचा महाराष्ट्र सहसचिव म्हणून विद्यार्थ्यांच्या व प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कार्य करत आहे

त्याचबरोबर गेल्या वर्षापासून संवेदना फेलोशिपच्या अंतर्गत रेल्वेच्या माध्यमातून जास्त जास्त संविधानाचा प्रचार व्हावा म्हणून संविधान रेल डब्बा ही संकल्पना सुरू केली.

गेल्या दहा वर्षापासून क्रांतीसुर्य संघटना ही महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लोकांना क्रांती रत्न या पुरस्काराने सन्मानित करते.

यावर्षी आमिर कझीचा संविधानिक व सामाजिक कार्याचा अभ्यास करून युवांना प्रेरित करण्यासाठी अमीर काझी यांना क्रांती रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्यावर परिसरात तुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *