खेड : तीन बत्ती नाका परिसरात जुगार अड्ड्यावर धाड, 4 जणांवर गुन्हा

banner 468x60

खेड शहरातील तीन बत्ती नाका येथील हनुमान मंदिरा नजीक सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी मंगळवारी सांयकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या धाडीत १० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र विठ्ठल जाधव ६१ रा संत सेना नगर खेड, महमद अजीज शेख ६२ रा पटेल मोहल्ला, शशिकांत रामजी तळेकर ५५, खारी भुवडवाडी , गणपत सहदेव बर्गे ४३ निजामपूर माणगाव जि रायगड अशी गुन्हा दाखल झालेल्या त्या चार जणांची नावे आहेत.

तीन बत्ती नाका परिसरात अवैध जुगार खेळताना हे चार जण आढळून आले त्यांच्या कडून ७३५० रुपयांची रोकड व इतर साहित्य असे १० हजार ३५० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *