Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

मंडणगड : 2 तास जोरदार पाऊस

banner 468x60

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात पावसाने शिडकावा करण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी सकाळपासून मळभ दाटून आले. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी सर्व तालुक्यात कोसळल्या.

मात्र, मंडणगड तालुक्यात दुपारच्या सुमारास सलग दोन तास जोरदार पाऊस पडत होता.गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने कोकणात पावसाची शक्यता वर्तविली आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना तीन ते चार दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीत अधूनमधून किरकोळ सरी पडत आहेत. सकाळपासून मळभाचे वातावरण होते. सकाळी मेघगर्जनेसह काही तालुक्यांमध्ये पावसाने हलक्या सरींनी हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मंडणगड वगळता अन्य तालुक्यांमध्ये हलक्या सरी पडल्या. यापावसाचा आंबा बागायदारांना फटका बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *