दाभोळ ग्रामपंचायतची निवडणूक 15 जानेवारी 2021 रोजी पार पडली दाभोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदय जावकर यांनी आपला अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
रिक्त झालेले या पदासाठी 20 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत गाव विकास आघाडीचे अभय कोयथळे यांची उपसरपंच म्हणून निवड झाली आहे.
15 सदस्यांसाठी दाभोळ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2021 रोजी महाविकास आघाडी विरुद्ध गाव विकास आघाडी यांच्यात झाली होती.
या निवडणुकीत गाव विकास आघाडीचे सर्वाधिक 10 सदस्य निवडून आले होते. अडीच वर्षापूर्वी एका बैठकीद्वारे झालेल्या तडजोडीत सुरुवातीची अडीच वर्ष सरपंच म्हणून संगीता दाभोळकर तर उपसरपंच म्हणून उदय जावकर आणि उर्वरित अडीच वर्षासाठी सरपंच म्हणून राखी तोडणकर व उपसरपंचपदी अभय गोयथळे यांची निवड करण्यात यावी असं ठरलं होतं.
त्याचप्रमाणे आताची अडीच वर्ष ग्रामपंचायतचा कारभार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी उपसरपंच गोयथळे यांनी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस श्रीराम इदाते, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय सावंत, महिला मोर्चा उपाध्यक्ष स्मिता जावकर, दाभोळ सरपंच राखी तोडणकर, उसगावचे सरपंच मृदुला गोईथळे, संदेश साळवी आदींनी अभिनंदन केलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















