खेड येथील एसटी स्थानकातील खासगी गाडी वरच्या चालकांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
खासगी कंत्राटदार यांच्या १३ गाड्यांवर २६ चालक गरजेचे असताना केवळ १२ चालक कार्यरत असून या चालकांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांवर डबल ड्युटी करुन घेतली जाते. यामुळे चालकांना पुरेशी झोप मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तर अपुऱ्या झोपेमुळे प्रवाशांचा जीव टांगणीस लागला आहे.
रत्नागिरी एसटी महामंडळाने विभागात खासगी गाड्यांचे लोकार्पण दिमाखात करण्यात आले. त्यापैकी खेड आगाराचा ठेका ‘साई गणेश ट्रॅव्हल्स’ कंत्राटदार यांना दिलेला आहे. या कंत्राटदारांच्या १३ खासगी गाड्या खेडमध्ये दाखल आहेत.
खेड एसटी आगारातून मुंबई, पुणे, ठाणे अशा लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतूकीसाठी या खासगी गाड्यांचा वापर होतो. या एकूण १३ गाड्यांकरिता प्रत्येकी दोन याप्रमाणे २६ चालक खासगी कंत्राटदार यांच्याकडे असणे आवश्यक आहे. मात्र, केवळ १२ चालक हे १३ खासगी बस चालवत आहेत.
खेडपासून लांब पल्ल्याच्या गाड्या चालक चालवत असल्याने या चालकांची झोप अपूरी राहते. या खासगी ठेका घेतलेल्या कंत्राटदारांने चालकांना ‘१५ दिवस ड्युटी आणि १५ दिवस आराम’, अशी संकल्पना राबविली जात आहे.
मुळात कमी चालक असताना डबल ड्युटीकरिता चालकांची ओढाताण होते. सर्व चालकांना जास्तीचे काम (ओव्हरटाईम) च्या नावाखाली अर्धवट झोपेत चालक खासगी बस चालवत आहेत.
या गंभीर प्रकारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचे दिसतं आहे. या चालकांची तपासणी वेळोवेळी परिवहन अधिकारी यांनी करावी, अशी मागणी प्रवासी जनतेतून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















