Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : लॉजमध्ये प्रौढाचा मृतदेह आढळला

banner 468x60

खेड येथील एका लॉजमध्ये मुंबईमधून येऊन राहिलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दि. ३ रोजी सकाळी ११ वाजता त्याचा मृतदेह लॉज कर्मचाऱ्याला आढळला.

अनिल धोंकडराम सोनावणे (वय ५१) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बांद्रा येथून कामासाठी अनिल सोनावणे हे खेड शहरातील श्रीनिवास बिल्डिंग येथील स्वागत लॉजमधील रूम क्रमांक ३ मध्ये उतरले होते.

शुक्रवारी सकाळीच्या सोनावणे हे जमिनीवर पडलेल्या स्थितीत कर्मचाऱ्यास दिसले. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *