शहरासह आता चोरट्यांनी आपला मोर्चा शहरालगत असलेल्या गावांकडे वळवला असून, चोरीचे सत्र आजच्या घडीला कायम आहे. रविवारी (ता. २९) रात्री खेड ते अलसुरे जाणाऱ्या रोडवर भोस्ते जलालशहा मोहल्ला येथील क्वालिटी फॅक्टरी अज्ञात चोरट्यांनी फोडून ३० हजार ६०० ची रोकड चोरली.
या प्रकरणी राहिल गोपीदास पिल्ले (वय ३०, व्यवसाय बेकरी, रा. भोस्ते जलालशहा मोहल्ला, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांच्या मालकीचा क्वालिटी फॅक्टरीचा अज्ञात चोरट्याने समोरील दर्शनी दरवाजा उघडून त्या द्वारे आत प्रवेश करून ऑफिसचे दरवाजाचे लॉक हत्याराने तोडून दरवाज्याचा कोयंडा कट करून त्या द्वारे ऑफिसमध्ये प्रवेश केला. ऑफिसचे काउन्टरचे डाव्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ३० हजार ६०० रुपयांची रोकड तसेच ॲल्युमिनियमचे पडदे लावण्याचे ३ रॉड, कागदपत्राची फाईल काउन्टरच्या ड्रॉवरसह चोरून नेली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















