खेड : जगबुडी नदीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या 2 जनावरांवर मगरीचा हल्ला

banner 468x60

जगबुडी नदीत मगरींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे हे आजवर अनेकदा स्पष्ट झाले आहे. याचा प्रत्यय नुकताच आलाय.

खेड तालुक्यातील सुकिवली-देववाडी जगबुडी नदीपात्रात पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन जनावरांवर मगरीने केलेल्या हल्ल्यात जनावरे गंभीररित्या जखमी झाली आहेत.

banner 728x90 banner 728x90

शशिकांत भार्गव पिंपळकर यांच्या मालकीची ही जनावरे असून दोघांवरही उपचार करण्यात आलेत. खेड येथील वनविभागाने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *