दाभोळ : दाभोळ ग्रामपंचायतचा अजब प्रकार, भर पावसात रस्ता दुरुस्ती, जनतेचा पैसा पाण्यात !

दाभोळ ग्रामपंचायतचा अजब प्रकार, भर पावसात रस्ता दुरुस्ती

banner 468x60

सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्या सुरु असून आनंदाचं, जल्लोषाचं वातावरण पहायला मिळत आहे. अशातच पाऊसही मुसळदार कोसळत आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

अशा भर पावसात दाभोळ ग्रामपंचायतचा अजब कारभार समोर आला आहे. मुळात दाभोळच्या रस्त्याने गेली कित्येक वर्ष डांबर पाहिली नाहीय.

मात्र रस्त्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण न करता मातीचा भराव ठाकून रस्ते बुजवण्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

भर पावसात रस्त्यावर मातीचा भराव टाकल्याने अवघ्या काही तासात हा मातीचा भराव वाहून गेलाय आणि रस्त्यावर चिखलाचा साम्राज्य पाहायला मिळत आहे.

या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सध्या समोर आले असून जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या महिनाभरातच रस्त्याची दुरावस्था होत आहे. काही दिवसापूर्वी भरलेले खड्डे पुन्हा उखडत आहे.

त्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतची कामे निकृष्ट दर्जाची होत असून, नागरीकांच्या कररुपी पैशाचा चुराडा सुरु असल्याच आरोप होत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

गेल्या महिनाभरापासून हे खड्डे भरण्याचे मागणी नागरिक करत आहेत. मात्र दाभोळ ग्रामपंचायतकडून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

खोदाई केलेल्या रस्त्यात पाणी साठून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस सुरु असताना रस्त्याचे काम करण्याची एवढी घाई का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करून रस्त्याची कामाची चौकशी करून दोषीवंर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

याचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्याने वाहनांची ये जाही सुरु आहे. अशा परिस्थितही रस्त्याचं काम सुरु आहे. दाभोळ ग्रामपंचायतचा अजब कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या या कृतीवर नागरिक संताप व्यक्त करतायेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *