Breaking News
दापोली : स्वयं-सहाय्यता बचत गटांतील महिला होणार उद्योजिका, ‘कृषी संगिनी’ समूहाकडून यशस्वी मार्गदर्शन खेड : लोटे एमआयडीसीत रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ संतप्त, संबंधित कारखान्यावर कठोर कारवाईची मागणी दापोली : शिवाजीनगर-भौंजाळी जिल्हा परिषद शाळेला ‘आदर्श शाळा पुरस्कार’; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव दापोली : साखळोली नं. 2 येथे कृषी संगिनींचा पुढाकार; ग्रामस्थांच्या सहभागातून तयार केला गावाचा सर्वसमावेशक नकाशा गुहागर : मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्याकडून जानवळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

गणरायाच्या स्वागताला शृंगारतळीतील बाजारपेठ सजली, दुकानदार सज्ज!

banner 468x60

योगेश तेलगडे : (प्रतिनिधी) श्री गणेश चतुर्थी अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपली असून

banner 728x90

🔴कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी kokan katta Live.. YouTube:https://youtube.com/@kokankattalive3128?si=UCKBHHfJyBBz0qeCचैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हिडिओ जरूर शेअर करा👉आपल्याला जाहिरात आणि बातम्या दयायच्या असतील तर संपर्क करा9960151909

गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी शृंगारतळी बाजारपेठ सजावट साहित्यांनी सजली आहे.

गणेशोत्सवासाठी झालर, कृत्रिम फुले, विविधरंगी छोट्या आकाराचे चेंडू, कापडातील आसन, मखर, गणेशमूर्ती ठेवण्यासाठी असणारी कमान तसेच धूप, अगरबत्ती, कापूर, गुलाल असे साहित्य विक्रीसाठी आले आहे. फळवाले, फुलवाले सुद्धा सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत. गणपती सजावटीसाठी विविध रंगाच्या माळा, हार, मुकुट, मखर, झुरमुळ्या, डिस्को विद्युत दिवे, कृत्रिम फुलांचे तोरण आदी साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. गणपती उत्सवासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *