मंडणगड : आंबेत पुलाच्या नवीन कामाला कोणताही धोका नाही

banner 468x60

म्हाप्रळ आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना जुन्या पिलरचे बांधकाम गुरूवारी कोसळले. मात्र हा गॅलरीचा भाग कोसळला असल्याने नवीन कामास धोका नसल्याचा निर्वाळा माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीकांत गणगणे यांनी सांगितले .

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, स्लॅबच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या बेअरिंग लावण्यात आल्यानंतर बेअरिंगची पाहणी करण्यासाठी गॅलरी तयार करण्यात आली होती.

या गॅलरीचे बांधकाम पडले आणि जुन्या पी. पिअर्सचा स्लॅब व आर्टिक्युलेशनचा भाग पूर्वी आवश्यक तेवढा तोडला होता.
नवीन गर्डर्सचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु असताना जुन्या पिअरचे आर्टिक्युलेशन पडले.

मात्र पुलाच्या स्लॅबच्या कामात यामुळे कोणतीही बाधा आली नसल्याची माहिती गणगणे यांनी दिली. मात्र या घटनेमुळे स्लॅबचे काम पूर्ण होण्याचे नियोजित वेळापत्रक लांबलेले असल्याने गणेशोत्सवात या पुलावरून वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता मावळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *