गुहागर : दापोली नंतर गुहागर बोऱ्या समुद्रकिनारी 20 किलो चरस आढळला

banner 468x60

गुहागर तालुक्यातील (Guhagar) बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्या उघडल्या असता त्यामध्ये चरस या अंमली पदार्थाची 18 पाकीटे होती. त्यांचे वजन 20 किलो 700 ग्रॅम इतके होते.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

सदर पाकीटे कस्टम विभागाने ताब्यात घेतली असून तालुक्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर कस्टमचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत आहेत.अशी माहिती बोऱ्या कस्टमचे अधीक्षक जय कुमार यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) दापोली (Dapoli) तालुक्यातील कद्रे, लाडघर, केळशी, कोळथळे, मुरुड, बुरोंडी, दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत चरस या अंमली पदार्थाची पाकीटे सापडल्याने कस्टम, पोलीस सावध झाले होते.

त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यास सुरवात केली. यामध्ये 19 ऑगस्ट रोजी बोऱ्या येथील समुद्रकिनाऱ्यांवर दोन गोणी आढळून आल्या. सदर बेवारस गोणी कस्टम विभागाने ताब्यात घेवून पाहणी केली. त्यावेळी या गोण्यांमध्ये अन्य ठिकाणी सापडलेल्या पाकीटांप्रमाणेच छोटी पाकीटे होती.

या पाकिटांमध्ये चरस 20 किलो 700 ग्रॅम हा अंमली पदार्थ होता. त्यामुळे जिल्ह्यात सापडलेल्या एकूण अंमली पदार्थांचे वजन आता 250 किलो इतके झाले आहे. या संदर्भात बोलताना कस्टमचे अधीक्षक जय कुमार यांनी सांगितले की, गुहागर तालुक्यात तसेच अन्य कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर निळ्या रंगाच्या गोणी सापडल्यास त्याची माहिती तातडीने देण्याचे आवाहन त्यांनी केली.

7888111184, 7827980605 या मोबाईल क्रमांकावर या संशयास्पद निळ्या गोणींची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भातील माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. मात्र कस्टमच्या अधिकाऱ्यांनी किंवा पोलीसांनी धाड टाकून एखाद्याकडील अंमली पदार्थांचे पाकीट जप्त केल्यास संबंधितांवर नार्कोटिक्स नियमातंर्गत कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *