चिपळूण : विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

banner 468x60

शहरातील एका सदनिकेत विज जोडणीचे काम करत असताना तरुणाला वीजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

ही घटना कापसाळ येथे शुक्रवारी (दि.१८) घडली. प्रथमेश प्रकाश साळवी (वय २४, मधलीवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा शहरातील पागनाका येथील गृह संकुलातील सदनिकेत वीज जोडणीचे काम करत होता.

हे काम सुरू असताना दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो बेशुद्ध पडला. त्याला काहींनी लागलीच कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.

प्रथमेश हा हरहुन्नरी, कष्टाळू होता. आयटीआय झाल्यानंतर त्याने इलेक्ट्रिकल डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.

घरी आई आणि दोन बहिणींसह राहणारा प्रथमेश इलेक्ट्रिकची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र, त्याच्या एकाएकी मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. प्रथमेशच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *