Breaking News
संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी संगमेश्वर: देवरुखात पिग्मी एजंट महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू राजापूर : 22 वर्षीय मतिमंद तरुणीवर तिघांकडून अत्याचार, तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी

राजापूर : 22 वर्षीय मतिमंद तरुणीवर तिघांकडून अत्याचार, तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

राजापूर तालुक्यात एका २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवर तिघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पीडित तरुणी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे राजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या काकांकडे कामासाठी राहत होती. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या कालावधीत तीन जणांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणातील संशयितांची नावे काशिनाथ बसान्ना गंगाशेट्टी (वय ४७, मूळ रा. वडावगी, विजापूर, कर्नाटक, सध्या रा. हातिवले) आणि वैभव विलास राऊत (वय २६, रा. आंगले, ता. राजापूर) अशी आहेत. तिसरा संशयित अल्पवयीन असून तो पीडित तरुणीच्या नातेसंबंधातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पीडित तरुणी काही दिवसांपूर्वी आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती. याचदरम्यान तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या माहितीमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांच्या उपस्थितीत पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी तिने तीन जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याची माहिती दिली. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन प्रौढ संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन संशयिताच्या पालकांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील करीत आहेत. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी, तिचा जबाब आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.


दिव्यांग तरुणीबाबत घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे परिसरात संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.