Breaking News
मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर! चिपळूण : सावर्डेत कंटेनरचे सील तोडून औषधांचे बॉक्स लंपास, 1.64 लाखांचा माल चोरीला रत्नागिरी : पोलिसांच्या 18 QRT जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी, भाट्ये समुद्रकिनारी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर

कोकण : मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे 11 कोटी मिळणार

banner 468x60

जिल्ह्यातील मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, मासेमारीत कोणतीही अडचण येऊ नये आणि मच्छिमारांच्या डिझेलचापरतावा थोडा तरी त्यांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्याला ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

 ते लवकरचजिल्ह्याला प्राप्त होतील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आली. दोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसायखात्याकडे येणार असून, ते पैसे लगेचच सोसायट्यांकडे वर्ग केले जाणार आहेत. अजूनही १९ कोटी रुपये येणे बाकी असून, तेहीलवकरात लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 मच्छिमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास मदतहोईल, यासाठी अधिवेशनानंतर हे पैसे तत्काळ वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या सोसायट्या आणितेथील मच्छिमारांना याचा लाभ होणार असून, 

राज्य सरकारकडून आतापर्यंत जास्तीत जास्त परतावा देण्यात आला आहे. पूर्वी ६०कोटींचा डिझेल परतावा येणे बाकी होते. परंतु, मुख्यमंत्री शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अधिवेशनानंतरतत्काळ हा परतावा मिळण्यास मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *