सायबर फसवणुकीत बँक खात्यातून गेलेले ५ लाख ८७ हजार रुपयांपैकी ५ लाख ३८ हजार रुपये परत मिळवण्यात नागरिकाला यश आले आहे. बँक ऑफ इंडियाच्या तत्परतेसह पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्तक्षेपामुळे ही रक्कम परत मिळाली. या प्रकरणात बँकेच्या सायबर विमा सुविधेचा महत्त्वपूर्ण उपयोग झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी धीरज यांच्या बँक खात्यातून २५ हजार, २ लाख आणि २ लाख रुपयांसह एकूण सुमारे ५ लाख ८७ हजार रुपये परस्पर वळते झाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मित्र राजेश सोहोनी यांना माहिती दिली. सोहोनी यांनी तातडीने बँक ऑफ इंडियाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून खाते गोठवण्याची विनंती केली. बँकेच्या ऑनलाइन सेवा विभागाने त्वरित कार्यवाही करत खाते गोठवले.
यानंतर राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रक्रियेतील अडचणींमुळे अखेर सायबर गुन्हे पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली. सोहोनी यांनी बँक ऑफ इंडियाच्या जयगड शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक धीरज कुमार यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. त्यानंतर धीरज यांनी रत्नागिरीत येऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. बँकेच्या प्रियांका कुमारी यांनी कागदपत्रे ऑनलाइन सादर करण्यासह सायबर विम्याचा दावा दाखल करण्यासाठी सहकार्य केले.
मात्र, सायबर गुन्हे विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकरणात अडचणी येत होत्या. त्यामुळे राजेश सोहोनी यांनी हा विषय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिला. सामंत यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासन, बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा पोलीस यंत्रणेतील सायबर विभागाची संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीनंतर प्रकरणाच्या पाठपुराव्याला गती मिळाली.
अखेर बँक ऑफ इंडियाच्या सायबर विमा दाव्याला मंजुरी मिळाली आणि धीरज यांच्या खात्यात ५ लाख ३८ हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे फसवणुकीत गेलेल्या रकमेचा मोठा हिस्सा परत मिळाला.
या प्रकरणात मदत केल्याबद्दल पालकमंत्री डॉ. उदय सामंत, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधणे, खाते गोठवण्याची विनंती करणे आणि १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर तक्रार नोंदवणे महत्त्वाचे असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














Понимание процедуры что такое банкротство физического лица помогает понять юридические и финансовые последствия для должника и его кредиторов.
Банкротство зачастую воспринимается как последний шанс восстановить финансовое положение или освободиться от долгов.