रत्नागिरी शहरानजीक दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या दोघांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २४) घडली. राजू भैरू कुरयाल (वय ५०, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. संजीवनी नगर, गोळप, रत्नागिरी) आणि संदीप प्रकाश यादव (वय ३५, रा. चापोली, ता. संगमेश्वर) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू कुरयाल हे शहरानजीकच्या कुर्ली फाटा येथील पिकअप शेडजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. तर संदीप यादव हे रेल्वेस्टेशन ते कुवारबाव या अंतर्गत रस्त्यावरील फुटपाथवर बेशुद्ध अवस्थेत आढळले.
दोघांनाही उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. शनिवारी सायंकाळी साडेसात ते रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
या दोन्ही प्रकरणांची शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













