सांधेदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी यांसारख्या अस्थिविकारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी अपरांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, चिपळूण यांच्या वतीने शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष अस्थिविकार व अस्थिघनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात केवळ ९९ रुपयांत अस्थिविकार तपासणी, हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीची बैठक, व्यायामाचा अभाव, वाढते वय, वजनवाढ, अनियमित आहार आणि कामाच्या पद्धतीमुळे सांधे व मणक्यांशी संबंधित तक्रारी वाढत आहेत. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यास दैनंदिन हालचालींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेदनांचे वेळीच निदान करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने अपरांत हॉस्पिटलतर्फे या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीश भास्करवार रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. हाडांची स्थिती, सांध्यांच्या तक्रारी आणि हालचालींशी संबंधित समस्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शन आणि आहारतज्ज्ञांचा सल्लाही उपलब्ध असेल.
या शिबिरामध्ये रक्तातील साखर, हृदयाचे ठोके, रक्तदाब, उंची-वजन, ऑक्सिजनची पातळी आणि बीएमआय यांसारख्या प्राथमिक आरोग्य तपासण्यांची सुविधाही देण्यात येणार आहे. याशिवाय एक्स-रे, सीटी स्कॅन, ईसीजी आणि रक्त तपासण्यांवर २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यास संबंधित शस्त्रक्रियेवरही २० टक्क्यांपर्यंत सवलत उपलब्ध राहणार आहे.
शिबिराचा तपशील :
- दिनांक : शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६
- वेळ : सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७
- ठिकाण : अपरांत हॉस्पिटल, भोगाळे, चिपळूण
- शिबिर शुल्क : ९९ रुपये
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
०२३५५-२५४२५४, ०२३५५-२५४२४५, ७९९८८९८९८९, ७९९८७३७३७३.
“सांधे वाचवा, सांधे जगवा आणि सांधे पुन्हा मिळवा” या संदेशातून नागरिकांनी हाडे व सांध्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन अपरांत हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













