रत्नागिरी शहर परिसरात विश्वासाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आपल्या मावशीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीला विश्रांती घेण्याच्या बहाण्याने लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रारही समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित तरुणाविरोधात पॉक्सो कायद्यासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावशीकडे राहण्यासाठी आली होती मुलगी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगी डिसेंबर २०२५ पासून आपल्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. आरोपी राज मनोज घोरपडे हा गेल्या पाच वर्षांपासून मुलीच्या मावशीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. त्यामुळे आरोपीची मुलीशी कौटुंबिक ओळख होती.
आरोपी मुलीला क्लासला येण्या-जाण्यासाठी सोडत असल्याची माहितीही समोर आली आहे. परिचयाच्या व्यक्तीवर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपीने मुलीला, तू काम करून थकली आहेस, थोडा वेळ विश्रांती घे, असे सांगितले. त्यानंतर तो तिला एका लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे एका खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे मुलगी घाबरली होती. मात्र, प्रकरणाची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी आरोपीने तिला धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले.
घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी आरोपीने धमकी दिली .
पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे पॉक्सो कायद्यासह संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्ह्याची ऑनलाइन नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका देसाई करीत आहेत. तपासादरम्यान घटनेशी संबंधित बाबींची पडताळणी केली जाणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













