राजापूर तालुक्यातील शेजवली (वरचीवाडी) येथे एका ३४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. जयेश महादेव राणे (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव असून, तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश राणे याने आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकघरात लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे शेजवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत आकस्मिक मृत्यू नोंद क्रमांक ६३/२०२६ अशी नोंद असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये पोलिसांनी नोंद केली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली.
या घटनेमुळे दारूच्या व्यसनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, व्यसनाधीन व्यक्तींना वेळीच मदत आणि समुपदेशन मिळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













