राजापूर तालुक्यातील शेजवली वरचीवाडी येथे ३४ वर्षीय तरुणाचा राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. जयेश महादेव राणे (वय ३४, रा. शेजवली, वरचीवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश राणे हा शेजवली वरचीवाडी येथील आपल्या राहत्या घरी स्वयंपाकघरात लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद क्रमांक ६३/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१९ वाजता करण्यात आली आहे.
या घटनेमुळे शेजवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













