ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच कोकण प्रदेशात उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानाचे नवे विक्रम नोंदले जात आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण प्रदेशात सोमवारी उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद झाली. यात सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा ३७ अशांवर नोंदला गेला. रत्नागिरी येथे आतापर्यंतचे ऑक्टोबरमधील हवामानाचे विक्रम मोडले जात आहे. तेथे सोमवारी ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जे मागील १४३ वर्षातील सर्वाधिक कमाल तापमान असून सरासरीहून ७.६ अंशांनी अधिक आहे. दरम्यान, मंगळवारीही सिंधुदुर्ग वगळता उर्वरित कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
कोकणातील बहुतांश भागात यंदा सरासरीहून अधिक तसेच सरासरीच्या आसपास पाऊस नोंदला गेला. मात्र, पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा पावसाचा खंड होता. त्यामुळेही नागरिकांना उकाडा सहन करावा लागला तसेच उत्तर कोकण प्रदेशात यंदा पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण कमी होते.
त्या दरम्यानही उष्णतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला होता. मोसमी पावसाने संपूर्ण राज्यातून माघार घेण्याअगोदरच म्हणजेच ८ ऑक्टोबरपूर्वीच कोकण प्रदेशात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उकाड्यात वाढ झाली असून मागील एक आठवड्याहून अधिक काळ ही स्थिती कायम आहे. रत्नागिरी येथे ८ ऑक्टोबर रोजी मागील १४३ वर्षातील ऑक्टोबरमधील सर्वाधिक कमाल तापमाची ( ३८.७ अंश सेल्सिअस ) नोंद झाली होती.
मात्र, सोमवारी नोंदल्या गेलेल्या तापमानाने हा विक्रम मोडला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील मागील १४३ वर्षातील सर्वाधिक दहा क्रमांकाच्या कमाल तापमानातील पाहिल्या चार क्रमांकाच्या नोंदी यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील आहेत. दरम्यान, सोमवारी हर्णे येथे ३८.५ अंश सेल्सिअस (७.४ अशांनी अधिक), डहाणू ३६.२, अलिबाग ३३.२ तर ठाणे येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













