दापोली तालुक्यातील गंधर्वनगरी येथे घराशेजारील शेवग्याच्या झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन पडल्याने ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी घडली. प्रदीप राजाराम शिगवण (वय ६८, रा. गंधर्वनगरी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास प्रदीप शिगवण हे आपल्या घराच्या बाजूला असलेल्या सुमारे आठ फूट उंच कंपाउंडच्या भिंतीवर चढून शेवग्याच्या झाडाच्या फांद्या तोडत होते. यावेळी अचानक त्यांचा तोल गेल्याने ते सागर गजानन वरवटकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लादी बसविलेल्या अंगणात पडले.
या घटनेत त्यांच्या नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.५५ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गंधर्वनगरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











