दापोलीतील व्यावसायिक ऋषिकेश मालू यांचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन

banner 468x60

दापोली येथील व्यावसायिक ऋषिकेश सुभाष मालू यांचे रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी दुःखद निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने दापोली शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ऋषिकेश मालू हे दापोली अर्बन बँकेचे माजी संचालक सुभाष काळूराम मालू यांचे सुपुत्र होते. एक उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मालू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ऋषिकेश हे सचिन आणि स्वप्नील यांचे बंधू, तर हृदयांश आणि हृदिमा यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात वडील सुभाष मालू, राजेश, कमलेश, सत्यजीत, सचिन, स्वप्नील, मुले हृदयांश, हृदिमा तसेच मोठा मालू परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज, रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दापोली येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे.

ऋषिकेश मालू यांच्या अकाली निधनाने मालू कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *