सावर्डे : महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्या नियोजित रत्नागिरी दौऱ्यादरम्यान ‘चला, शाळेत जाऊया’ या अभियानांतर्गत सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची माहिती घेतली. राज्यस्तरीय व विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेली मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कौतुक केले. विद्यालयाने विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच क्रीडा व इतर क्षेत्रांत योग्य संधी उपलब्ध झाल्यास ते निश्चितच मोठी भरारी घेऊ शकतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा आणि अन्य उपक्रमांनाही महत्त्व देणे आवश्यक असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.
या प्रसंगी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिखर निकम, जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणमंत्र्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या यशाचा गौरव आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













