Breaking News
दापोली : गोपाळकृष्ण पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाला कोल्हापूर सर्किट बेंचकडून अटकपूर्व जामीन मंजूर सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या, उन्हाच्या तीव्रतेमुळे वैभव नाईकांची मागणी, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लांजा : 27 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, गळफास घेण्याचा केला होता प्रयत्न ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, आमदार शेखर निकम यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली संगमेश्वर : देवरुख सुवर्णकार अपहरण-दरोडा प्रकरण- वर्षभर फरार चार आरोपी जेरबंद, चार आरोपींना कल्याण, नवी मुंबई आणि बारामतीतून अटक, गुन्ह्यातील अर्टिगा कारही जप्त

सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या, उन्हाच्या तीव्रतेमुळे वैभव नाईकांची मागणी, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र

banner 468x60

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या तापमानाचा शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात, अशी मागणी कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी असून उन्हाच्या झळा तीव्र झाल्याचे नाईक यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत असून, विशेषतः दुपारच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुपारच्या वेळेत वातावरणातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे वैभव नाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

“उन्हाच्या तीव्रतेपासून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळावा, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात,” अशी मागणी वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *