पुणे येथे ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘विंटरन पुणे’ मॅरेथॉन स्पर्धेत गुहागर तालुक्याचे सुपुत्र अनंत तानकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
तानकर यांनी २१ किलोमीटरचे अंतर अवघ्या १ तास ३९ मिनिटांत पूर्ण करत आपल्या उत्कृष्ट धावण्याच्या कौशल्याची छाप पाडली. त्यांच्या या कामगिरीमुळे गुहागर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अनंत तानकर यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, जिद्द आणि धावण्याची आवड यांचा मोठा वाटा असल्याचे क्रीडा क्षेत्रातून सांगितले जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सातत्य कायम ठेवत त्यांनी मॅरेथॉनमध्ये मिळवलेले हे यश नवोदित धावपटूंसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
‘ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने मेहनत केली, तर कोणतेही शिखर गाठता येते’, हे तानकर यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गुहागर तालुक्यातील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













