Breaking News
गुहागर : अनंत तानकरांची मॅरेथॉनमध्ये दमदार कामगिरी, 21 किमी शर्यतीत पटकावला द्वितीय क्रमांक लांज्यात 16 वर्षीय मुलगा बेपत्ता, पोलिसांत नोंद रत्नागिरी : गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 1.92 लाखांचा मुद्देमाल जप्त, 40 लिटर तयार हातभट्टी दारू जप्त राजापूर : राजापुरात रस्त्यावर मासेविक्री, सहा महिलांवर नगरपरिषदेची कारवाई, मच्छीची खवले व सांडपाणी रस्त्यावर टाकून दुर्गंधी पसरवल्याचा आरोप, सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल चिपळूण : चिपळूण बाजारपेठेत फटाके विक्रीला बंदी, नगरपरिषदेचा मोठा निर्णय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करणार; सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाची खबरदारी

लांज्यात 16 वर्षीय मुलगा बेपत्ता, पोलिसांत नोंद

banner 468x60

लांजा शहरातील मुजावरवाडी येथील १६ वर्षीय अलमीन आरिफ पावसकर हा मुलगा बेपत्ता झाला आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास क्लासला जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.

अलमीन याचा रंग सावळा असून उंची सुमारे पाच फूट दोन इंच आहे. त्याची शरीरयष्टी सडपातळ असून केस मोठे आहेत. घरातून बाहेर पडताना त्याने राखाडी रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची पूर्ण लांबीची पँट परिधान केली होती. त्याच्याकडे काळ्या रंगाची स्कूल बॅग होती.

अलमीनबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *