Breaking News
खेड : 51 वर्षीय व्यक्तीचा गळफास घेऊन मृत्यू, राहत्या घरात मृतावस्थेत आढळले दापोली : स्वरा चव्हाणचे मैदानी स्पर्धेत दुहेरी यश, गोळाफेकीत रौप्य, थाळीफेकीत कांस्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड चिपळूण : दोघांचं प्रेम लपवण्यासाठी तिसऱ्याचा बळी? अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, मृत्यूप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा, बदनामी आणि मानसिक छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप, मृत्यूपूर्वी चिठ्ठीत माहिती समोर दापोली : बेकायदा मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त, एकाविरोधात गुन्हा दापोली : चिखलगाव बॉक्साईट प्रकल्प आणि भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची धडक, चिखलगावातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग, तहसीलदार अर्चना बोंबे यांना निवेदन

खेड : 51 वर्षीय व्यक्तीचा गळफास घेऊन मृत्यू, राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

banner 468x60

खेड तालुक्यातील सात्वीनगाव बोलेवाडी येथे एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. सोनू शंकर बोले (वय ५१, रा. सात्वीनगाव, ता. खेड) हे त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास सोनू बोले हे घरात मृतावस्थेत आढळले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी घरातील माळ्याच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया केली.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करत असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *