Breaking News
दापोली : कामगार बेपत्ता, तब्येत बिघडल्याचे सांगून गावी निघाल्यानंतर संपर्क तुटला, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदी करण्याच्या कारणावरून सप्लायरला मारहाण, लोखंडी फायटरने हल्ला, चाकूनेही वाराचा प्रयत्न रत्नागिरी : जैतापूर समुद्रात मासेमारी करताना खलाशाला समुद्री सापाचा दंश, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू लांजा : पहाटे महामार्गालगत संशयास्पद वावर, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी घेतले ताब्यात दाभोळ : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची दादरमध्ये भव्य सभा, वणौशी, दुमदेव, भिवबंदरचे ग्रामस्थ एकवटले, आरपारच्या लढ्याचा निर्धार, ‘जमीन आमची, निर्णयही आमचा’ म्हणत प्रकल्पाला विरोध

चिपळूण : पहाटे अंधारात संशयास्पद हालचाली, चोरीच्या उद्देशाने दबा धरल्याचा संशय, तरुण पोलिसांच्या ताब्यात

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या एका परप्रांतीय मजुराला चिपळूण पोलिसांनी गस्तीदरम्यान ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुनकुमार बाल्मिकी सहा (वय २७, रा. पंडितपूर, जि. गोपाळगंज, बिहार) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक ग्रामीण भागात नियमित गस्त घालत होते. यावेळी पहाटे सुमारे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते येथील मराठी शाळेजवळ पोलिसांना एक तरुण अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या उभा असल्याचे दिसून आले.

सदर तरुण पोलिसांपासून आपली ओळख आणि हालचाली लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्तीवरील पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी इतक्या पहाटेच्या वेळी अंधारात शाळेजवळ संशयास्पद अवस्थेत का थांबला होता, याबाबत त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने समाधानकारक माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्याच्या हालचालींबाबत पोलिसांचा संशय अधिक बळावला.

दरम्यान, चोरीच्या उद्देशाने तो परिसरात दबा धरून बसला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली.

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश मनोहर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुनकुमार बाल्मिकी सहा याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत असून, संशयिताच्या पूर्वीच्या हालचाली तसेच तो परिसरात नेमका कोणत्या कारणासाठी आला होता, याबाबतही तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *